मित्रहो
देवयानी प्रकरणात राष्ट्रीय म्हणवल्या जाणा-या मेडीयाने आता जी भूमिका घेतली आहे त्यावरून त्याला ब्राह्मणी मेडीया असं का म्हटलं जातं हे लक्षात येईल. त्यांच्या या घटनेतील भूमिकेचं विश्लेषण आपण अतिशय कठोर पद्धतीने करणार आहोत. वाचकांनी आपली मतं कळवावीत हे नम्र आवाहन करीत आहोत. सुनील खोब्रागडे यांच्याच शब्दात वस्तुस्थिती जाणून घ्यावी ही नम्र विनंती.
धन्यवाद.
देवयानी प्रकरणात राष्ट्रीय म्हणवल्या जाणा-या मेडीयाने आता जी भूमिका घेतली आहे त्यावरून त्याला ब्राह्मणी मेडीया असं का म्हटलं जातं हे लक्षात येईल. त्यांच्या या घटनेतील भूमिकेचं विश्लेषण आपण अतिशय कठोर पद्धतीने करणार आहोत. वाचकांनी आपली मतं कळवावीत हे नम्र आवाहन करीत आहोत. सुनील खोब्रागडे यांच्याच शब्दात वस्तुस्थिती जाणून घ्यावी ही नम्र विनंती.
धन्यवाद.
Status Update
By Sunil Khobragade
ज्याना
 फक्त दोष शोधायचे आहेत त्यांना आपल्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही पण 
दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ मात्र दिसते असा प्रकार देवयानी खोब्रागडेच्या 
बाबतीत जातकिड्यांनी चालविला आहे. दुसऱ्यांनी पैसे खर्च करून सुरु केलेल्या
 वर्तमान पत्रात पोटार्थी पत्रकार म्हणून काम करणारे लोक आपल्या जातभाईच्या
 रक्षणासाठी " आयजी च्या जीवावर बायजी उदार " या थाटात वस्तुस्थितीची 
मोडतोड करतात याचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे. देवयानी यांची यूएनमधली एकदा 
जबाबदारी संपली तर त्यांना राजदुत म्हणून असलेली सुटही संपेल आणि मग 
त्यांना कुठल्याही क्षणी अटक होऊ शकेल मगच  साऱ्या ब्रह्मसमन्धाना शांती 
लाभेल अश्या दिवास्वप्नात असणाऱ्या या जातकिड्यांची कीव करावी तेवढी थोडी 
आहे.कदाचित तोपर्यंत देवयानी यांची पदोन्नती होऊन त्या दुसऱ्या देशात 
राजदूत म्हणून जाऊ शकतील किवा त्यांच्यावरील खटल्यातून निर्दोषही सुटू 
शकतील.त्यांचे पती आकाश सिंघ राठोड वाईन चे तज्ज्ञ आहेत हा त्यांचा गुन्हा 
आहे काय ? ते जगातील 18  भाषांचे जाणकार आहेत,इंग्रजी आणि जर्मन भाषेत 
पारंगत आहेत,तत्वज्ञानाचे डॉक्टरेट आहेत,जगातील उत्कृष्ट वाईन तज्ज्ञ 
आहेत.. भारतीय, अफगाण आणि इराणी वाईन्स चे जगातील ते एकमेव तज्ज्ञ 
आहेत.फिलाडेल्फिया विद्यापीठात ते वाइन मेकिंग व मार्केटिंग विषय 
शिकवितात.त्यांचे The Complete Indian Wine Guide हे जगप्रसिद्ध पुस्तक 
वाइन या विषयावरील सर्वोत्कृष्ट अधिकृत ग्रंथ समजला जातो.भारत सरकारने 
त्यांना वाईन उद्योगाचे सल्लागार म्हणून नेमले आहे या त्यांच्या 
गुणवत्तेबद्दल अभिमान वाटावयास हवा.पण त्यांनी एका बौद्ध मुलीशी लग्न केले 
यामुळे त्यांचे हे सर्व सद्गुण जातकिड्यांना दुर्गुण वाटतात.अन्यथा त्यांनी
 रकानेच्या रकाने भरून याच आकाश सिंग चे कौतुक केले असते.देवयानीचा पती 
अमेरिकन नागरिक आहे म्हणून तिच्या अडचणीत वाढ होईल म्हणणारे ही शक्यता का 
लक्षात घेत नाहीत कि उद्या कदाचित आकाश सिंग राठोर भारतीय नागरिकत्वही 
स्विकारेल.देवयानी खोब्रागडे हिला जर्मन भाषा मिळावी म्हणून उत्तम 
खोब्रागडेंनी राजकीय संबंध वापरल्याचा आरोप करनारे आणि महावीर सिंघवी याला 
डावलले म्हणनारे  हे दडवून ठेवतात  कि महावीर सिंघवी याने आपल्या 
वर्गमैत्रीण मुलीशी लग्नाचे आमिष दाखवून  प्रेमसंबंध प्रस्थापित केले 
होते.IFS झाल्यानंतर मोठा हुंडा घेऊन दुसऱ्या मुलीशी त्याने लग्न 
जोडले.याविरोधात मुलीची आई नरेंदर कौर चढ्ढा हिने महावीर संघविनी आपल्या 
मुलीचे लैंगिक शोषण व  फसवणूक केल्याची तक्रार केली.याविरुद्ध तत्कालीन 
परराष्ट्र मंत्री जसवंत सिंघ (भाजप )यांनी चौकशी करून महावीर संघवी याला 13
 .6 . 2002 रोजी नोकरीतून काढून टाकले. याविरुद्ध त्याने CAT मध्ये तक्रार 
केली.CAT ने सरकारचे आदेश ग्राह्य ठरविले याविरोधात संघवी ने दिल्ली उच्च 
न्यायालयात अपील केले.उच्च न्यायालयाने 2008 मध्ये संघाविच्या बाजूने 
निर्णय दिला.याविरोधात केंद्र सरकार सर्वोच्च न्यालयात गेले.सर्वोच्च 
न्यायालयाने संघविच्या बाजूने निर्णय दिला.या खटल्यात संघवी च्या विरोधात 
तक्रार करणाऱ्या महिलेची तक्रार सिद्ध झाली नाही आणि संघवी च्या विरोधात 
नियमानुसार चौकशी करण्यात आली नाही या कारणास्तव न्यायालयाने संघवीला 
नोकरीतून काढून टाकण्याचे आदेश रद्द केले आहेत.IFS cadre साठी कोणती  
विदेशी भाषा कशी allot करावी याचे कोणतेही लिखित नियम त्यावेळी 
नव्हते.आवश्यकता व तत्कालीन स्थिती पाहून याचा निर्णय परराष्ट्र 
मंत्रालयातील संबंधित अधिकारी मंत्र्याच्या मंजुरीने घेत असत.त्यावेळचा 
अप्पर मुख्य सचिव P.L. Goyal याने त्यानुसार निर्णय घेतला.त्याला जर्मन 
भाषा घेण्यास डावलण्यात आले यासाठी तो न्यायालयात गेला नव्हता तर त्याला 
लैंगिक शोषण आणि लग्नाचे आमिष देवून फसवणूक हा आरोप खोडून काढण्यासाठी 
त्यांनी उपस्थित केलेल्या बचावाच्या अनेक मुद्द्यापैकी एक मुद्दा होता.केवळ
 हाच मुद्दा ग्राह्य धरून यावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला 
नव्हता.उत्तम खोब्रागडेंनी राजकीय संबंध वापरून महावीर सिंघवी याला जर्मन 
भाषा घेण्यापासून डावलले म्हणनारानी हे लक्षात घ्यावे कि त्यावेळी केंद्रात
 भाजप चे सरकार होते व जसवंत सिंग परराष्ट्र मंत्री होते. महाराष्ट्रात 
सेना-भाजप चे सरकार होते.या सरकारने उत्तम खोब्रागडे यांनी अमिताभ बच्चन 
यांना दोन कोटी रुपयाच्या दंडाची शिक्षा दिली या कारणास्तव सजा म्हणून  
MAFCO या बंद पडलेल्या महामंडळाचे MD  म्हणून बदली केली होती.त्यावेळी 
त्यांचा दर्जा उपसचिव असा होता.सुज्ञानी हा विचार करावा कि एक उपसचिव 
दर्जाचा दलित अधिकारी भाजपच्या शासन काळात केंद्राच्या अप्पर मुख्य सचिव 
म्हणजेच राज्याच्या मुख्य सचिव दर्जाच्या अधिकार्यावर आणि जसवंत सिंघ 
सारख्या परराष्ट्र मंत्र्यावर दबाव आणू शकतो काय? उत्तम खोब्रागडे आणि 
देवयानी खोब्रागडे हे बौद्ध अधिकारी असल्यामुळे जातकिड्यांनी योजनाबद्ध 
रीतीने त्यांची  प्रतिमा मलिन करण्याचे कारस्थान चालविले आहे हे सुद्न्य 
भारतीयांनी लक्षात घ्यावे.Ref : -
http://www.indianexpress.com/news/govt-told-to-reinstate-sacked-ifs-officer/656709/
http://www.indiankanoon.org/doc/1494941/
https://www.facebook.com/sunil.khobragade1/posts/10202195588945195?comment_id=6767660¬if_t=like
 
No comments:
Post a Comment