Showing posts with label देवयानी खोब्रागडे. Show all posts
Showing posts with label देवयानी खोब्रागडे. Show all posts

Monday, December 23, 2013

देवयानी खोब्रागडे यांच्याबद्दल खोडसाळ प्रचार : ब्रह्मसत्तेला लागले जुलाब - भाग ३

मित्रहो

देवयानी प्रकरणात राष्ट्रीय म्हणवल्या जाणा-या मेडीयाने आता जी भूमिका घेतली आहे त्यावरून त्याला ब्राह्मणी मेडीया असं का म्हटलं जातं हे लक्षात येईल. त्यांच्या या घटनेतील भूमिकेचं विश्लेषण आपण अतिशय कठोर पद्धतीने करणार आहोत. वाचकांनी आपली मतं कळवावीत हे नम्र आवाहन करीत आहोत. सुनील खोब्रागडे यांच्याच शब्दात वस्तुस्थिती जाणून घ्यावी ही नम्र विनंती.
धन्यवाद.

Status Update
By Sunil Khobragade
ज्याना फक्त दोष शोधायचे आहेत त्यांना आपल्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही पण दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ मात्र दिसते असा प्रकार देवयानी खोब्रागडेच्या बाबतीत जातकिड्यांनी चालविला आहे. दुसऱ्यांनी पैसे खर्च करून सुरु केलेल्या वर्तमान पत्रात पोटार्थी पत्रकार म्हणून काम करणारे लोक आपल्या जातभाईच्या रक्षणासाठी " आयजी च्या जीवावर बायजी उदार " या थाटात वस्तुस्थितीची मोडतोड करतात याचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे. देवयानी यांची यूएनमधली एकदा जबाबदारी संपली तर त्यांना राजदुत म्हणून असलेली सुटही संपेल आणि मग त्यांना कुठल्याही क्षणी अटक होऊ शकेल मगच साऱ्या ब्रह्मसमन्धाना शांती लाभेल अश्या दिवास्वप्नात असणाऱ्या या जातकिड्यांची कीव करावी तेवढी थोडी आहे.कदाचित तोपर्यंत देवयानी यांची पदोन्नती होऊन त्या दुसऱ्या देशात राजदूत म्हणून जाऊ शकतील किवा त्यांच्यावरील खटल्यातून निर्दोषही सुटू शकतील.त्यांचे पती आकाश सिंघ राठोड वाईन चे तज्ज्ञ आहेत हा त्यांचा गुन्हा आहे काय ? ते जगातील 18 भाषांचे जाणकार आहेत,इंग्रजी आणि जर्मन भाषेत पारंगत आहेत,तत्वज्ञानाचे डॉक्टरेट आहेत,जगातील उत्कृष्ट वाईन तज्ज्ञ आहेत.. भारतीय, अफगाण आणि इराणी वाईन्स चे जगातील ते एकमेव तज्ज्ञ आहेत.फिलाडेल्फिया विद्यापीठात ते वाइन मेकिंग व मार्केटिंग विषय शिकवितात.त्यांचे The Complete Indian Wine Guide हे जगप्रसिद्ध पुस्तक वाइन या विषयावरील सर्वोत्कृष्ट अधिकृत ग्रंथ समजला जातो.भारत सरकारने त्यांना वाईन उद्योगाचे सल्लागार म्हणून नेमले आहे या त्यांच्या गुणवत्तेबद्दल अभिमान वाटावयास हवा.पण त्यांनी एका बौद्ध मुलीशी लग्न केले यामुळे त्यांचे हे सर्व सद्गुण जातकिड्यांना दुर्गुण वाटतात.अन्यथा त्यांनी रकानेच्या रकाने भरून याच आकाश सिंग चे कौतुक केले असते.देवयानीचा पती अमेरिकन नागरिक आहे म्हणून तिच्या अडचणीत वाढ होईल म्हणणारे ही शक्यता का लक्षात घेत नाहीत कि उद्या कदाचित आकाश सिंग राठोर भारतीय नागरिकत्वही स्विकारेल.देवयानी खोब्रागडे हिला जर्मन भाषा मिळावी म्हणून उत्तम खोब्रागडेंनी राजकीय संबंध वापरल्याचा आरोप करनारे आणि महावीर सिंघवी याला डावलले म्हणनारे हे दडवून ठेवतात कि महावीर सिंघवी याने आपल्या वर्गमैत्रीण मुलीशी लग्नाचे आमिष दाखवून प्रेमसंबंध प्रस्थापित केले होते.IFS झाल्यानंतर मोठा हुंडा घेऊन दुसऱ्या मुलीशी त्याने लग्न जोडले.याविरोधात मुलीची आई नरेंदर कौर चढ्ढा हिने महावीर संघविनी आपल्या मुलीचे लैंगिक शोषण व फसवणूक केल्याची तक्रार केली.याविरुद्ध तत्कालीन परराष्ट्र मंत्री जसवंत सिंघ (भाजप )यांनी चौकशी करून महावीर संघवी याला 13 .6 . 2002 रोजी नोकरीतून काढून टाकले. याविरुद्ध त्याने CAT मध्ये तक्रार केली.CAT ने सरकारचे आदेश ग्राह्य ठरविले याविरोधात संघवी ने दिल्ली उच्च न्यायालयात अपील केले.उच्च न्यायालयाने 2008 मध्ये संघाविच्या बाजूने निर्णय दिला.याविरोधात केंद्र सरकार सर्वोच्च न्यालयात गेले.सर्वोच्च न्यायालयाने संघविच्या बाजूने निर्णय दिला.या खटल्यात संघवी च्या विरोधात तक्रार करणाऱ्या महिलेची तक्रार सिद्ध झाली नाही आणि संघवी च्या विरोधात नियमानुसार चौकशी करण्यात आली नाही या कारणास्तव न्यायालयाने संघवीला नोकरीतून काढून टाकण्याचे आदेश रद्द केले आहेत.IFS cadre साठी कोणती विदेशी भाषा कशी allot करावी याचे कोणतेही लिखित नियम त्यावेळी नव्हते.आवश्यकता व तत्कालीन स्थिती पाहून याचा निर्णय परराष्ट्र मंत्रालयातील संबंधित अधिकारी मंत्र्याच्या मंजुरीने घेत असत.त्यावेळचा अप्पर मुख्य सचिव P.L. Goyal याने त्यानुसार निर्णय घेतला.त्याला जर्मन भाषा घेण्यास डावलण्यात आले यासाठी तो न्यायालयात गेला नव्हता तर त्याला लैंगिक शोषण आणि लग्नाचे आमिष देवून फसवणूक हा आरोप खोडून काढण्यासाठी त्यांनी उपस्थित केलेल्या बचावाच्या अनेक मुद्द्यापैकी एक मुद्दा होता.केवळ हाच मुद्दा ग्राह्य धरून यावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला नव्हता.उत्तम खोब्रागडेंनी राजकीय संबंध वापरून महावीर सिंघवी याला जर्मन भाषा घेण्यापासून डावलले म्हणनारानी हे लक्षात घ्यावे कि त्यावेळी केंद्रात भाजप चे सरकार होते व जसवंत सिंग परराष्ट्र मंत्री होते. महाराष्ट्रात सेना-भाजप चे सरकार होते.या सरकारने उत्तम खोब्रागडे यांनी अमिताभ बच्चन यांना दोन कोटी रुपयाच्या दंडाची शिक्षा दिली या कारणास्तव सजा म्हणून MAFCO या बंद पडलेल्या महामंडळाचे MD म्हणून बदली केली होती.त्यावेळी त्यांचा दर्जा उपसचिव असा होता.सुज्ञानी हा विचार करावा कि एक उपसचिव दर्जाचा दलित अधिकारी भाजपच्या शासन काळात केंद्राच्या अप्पर मुख्य सचिव म्हणजेच राज्याच्या मुख्य सचिव दर्जाच्या अधिकार्यावर आणि जसवंत सिंघ सारख्या परराष्ट्र मंत्र्यावर दबाव आणू शकतो काय? उत्तम खोब्रागडे आणि देवयानी खोब्रागडे हे बौद्ध अधिकारी असल्यामुळे जातकिड्यांनी योजनाबद्ध रीतीने त्यांची प्रतिमा मलिन करण्याचे कारस्थान चालविले आहे हे सुद्न्य भारतीयांनी लक्षात घ्यावे.

Ref : -
http://www.indianexpress.com/news/govt-told-to-reinstate-sacked-ifs-officer/656709/

http://www.indiankanoon.org/doc/1494941/

https://www.facebook.com/sunil.khobragade1/posts/10202195588945195?comment_id=6767660&notif_t=like 

Saturday, December 21, 2013

देवयानी निर्दोषच : मात्र ब्रह्मसत्तेला लागले जुलाब - भाग २

देवयानी निर्दोषच : मात्र ब्रह्मसत्तेला लागले जुलाब - भाग २



देवयानीच्या वकिलाने सीएनएन वाहीनीला मुलाखत देताना देवयानीची अटक कशी बेकायदेशीर होती हे सांगितलं आहे.

 http://us.cnn.com/video/data/2.0/video/bestoftv/2013/12/19/indian-diplomat-arrested-arshack-newday.cnn.html

देवयानी निर्दोषच

http://www.dailymail.co.uk/indiahome/indianews/article-2526067/Decoding-Khobragade-controversy-How-row-maids-visa-sparked-scale-diplomatic-incident.html

http://m.niticentral.com/2013/12/22/us-law-gives-devyani-full-legal-immunity-171428.html

आंतरराष्ट्रीय मेडीया देवयानीची बाजू घेत असताना भारतातले आणि विशेषत: महाराष्ट्रातले काही जातीयवादी देवयानीने गुन्हा केला आहे असा गळा काढताहेत.  यांच्यासाठी एकच प्रश्न विचारायचाय.

वसंत ढोबळे ची बदली करा म्हणून रस्त्यावर कोण आलं होतं बरं ? का आले होते बरं ? आमची पोरं सोडा म्हणून कोण गळे काढत होतं ? दारू पिलेली मुलं कुणाची होती ? पब्ज मधे नाचणा-या विवस्त्र मुली कुणाच्या होत्या ? केव्हढा हा कायदेपालनाचा अट्टाहास. काश देवयानी भी देशपांडे या कुबेर होती ! आज ओबामाला राजीनामा द्यायला लागला असता.
जयराज फाटक, प्रदीप व्यास कोण आहेत बरं ? बघा सापडतंय का गूगल सर्च देऊन ?

देवयानी खोब्रागडे प्रकरणात कितीही पुरावे दिले तरी वसंत ढोबळे प्रकरणी कारवाई करू नका म्हणणारे ती दोषीच आहे यावर हटून बसलेत.

अमेरीकेत झाडू मारायला गेलेल्या एका बाईने एक संकेतस्थळावर तारे तोडलेत कि तिला मेडची आवश्यकता काय ? इथं अजिबात गरज लागत नाही. ही बाई स्वत:हून अमेरीकेत शौचालयं साफ करायला गेलीय. तिला कुणी जबरदस्ती केलेली नाही. तिला आपल्या निष्ठा त्या देशाशी वाहणे भाग आहे.  देवयानी या भारताच्या दूत आहेत. त्यांना दोन लहान मुलं आहेत. एकाचं वय ३ वर्षे तर दुस-याचं ६ वर्षे. भारतीय वकिलातीत जबाबदा-या पार पाडणे आणि या बाई करतात तसं शौचालयं साफ करणं या कामांची तुलना करता येईल का ? या बाईला शौचालयं साफ करतानाही तिच्या एम्लॉयरच्या खर्चाने इंटरनेटवर फुकट बागडता येतं. तिने असे अकलेचे तारे तोडावेत ? लायकी आहे का ?

ब्रह्मसत्तेने म्हटलेय कि परराष्ट्रखात्यातले अधिकारी माजलेत. असं असेल तर त्यांनी नम्रपणे आपल्या जबाबदा-या पार पाडायला नकार द्यायला हवा. पाचव्या वेतन आयोगानुसार वर्ग २ राजपत्रित अधिका-याला नवी दिल्लीत दौ-यावर गेले असता ५२ रु भत्ता मिळायचा, तर गोव्यात २८ रु भत्ता मिळायचा. गोव्यात एका ठिकाणाहून दुसरीकडे जायला मोटरसायकलस्वार ५ किमी चे पंधरा रुपये घ्यायचा. सरकारी नोकरांना भत्ते वाढवले कि हेच लोक ओरडणार आणि आज जो प्रसग ओढवला तसं झालं तरी हेच लोक ओरडणार. काही विद्वान म्हणत होते सरकार झोपा काढत होतं का ? त्यांना आपल्या अधिका-यांची काळजी नाही का ? नुकतंच खुर्शीद यांनी अमेरीकेत मिशनवर जाणा-या अधिका-यांचे भत्ते वाढवण्यात येतील असं सूतोवाच केलं तेव्हां आधी ओरडणा-या एकाने नेमकी पलटी खात प्रतिक्रिया दिली कि हे संतापजनक आहे. आमचा टॅक्सचा पैसा या अधिका-यांवर उधळायचा परवाना तुम्हाला कुणी दिला ? यातले काही जण तर अमेरीकेत बसून भारताचा टॅक्स कसा भरत असावेत याचं उत्तर काही करून मिळालेलं नाही.

ब्रह्मसत्तेच्या शिरीष झुबेरला विचारायचंय कि जर देवयानीचं आडनाव कुबेर किंवा देशपांडे असतं तर तुम्ही हीच भूमिका घेतली असती का ? नुपूर तलवार म्हणजेच आरुषीची हत्यारी आई आपल्या जातीची आहे हे दडवून ठेवण-यांनी आपापल्या पेपरच्या बातम्यांखाली देवयानीच्या जातीचा उद्धार होईल अशा प्रतिक्रिया येऊ दिल्या आणि त्याला उत्तर देणा-या प्रतिक्रिया ब्लॉक केल्या. ते का म्हणून ? नुपूर तलवारच्या बहिणीची मुलाखत घेतली गेली. त्या बाईने माझा भारतीय न्यायव्यवस्थेवरचा विश्वास पूर्णपणे उडाल्याचं सांगितलं आणि मुलाखतकाराने तिला आडवे उभे प्रश्न विचारले नाहीत. नुपूरच्या आईवडीलांची मुलाखत घेण्यात आली. हेसर्व कशासाठी ? भारतीय न्यायपालिकेने एकदा नव्हे पुन्हा पुन्हा खटले चालवूनही दोषी ठरवलेल्या व्यक्तीसाठी इतका आटापिटा का ? ती स्वजातीची म्हणूनच ना ?

बोला ब्रह्मसत्तकार बोला. आहे का उत्तर या प्रश्नाचं ?

अहो, तुमची लेखणी आता जशी वळवळली ती खैरलांजीच्या वेळी थंडीने गारठली होती कि काय ? मुंबईत या ब्रह्मसत्तेचं कार्यालय ज्या इमारतीत आहे त्या हायवे टॉवरची जमीन तुम्हाला सरकारनेच दिली होती ना ? मग ती आता येरवड्यातल्या सर्वे क्रम १९१ /अ भूखंडातल्या आणि २ जी प्रकरणी दोषी असलेल्या ग्रुपला विकताना तुम्हाला कायदे, नैतिकता काहीच आठवलं नाही का ? जी जमीन तुम्हाला सरकारने दिलीय तिचा तुम्हाला त्या कारणासाठी वापर करायचा नसेल तर ती जमीन सरकारला परत करावे लागते हा कायदा आहे. ब्रह्मसत्ताकार आपला पेपर जे लोक चालवतात त्यांच्याविरुद्ध तुमची लेखणी चालणार का ?
ब्रह्मसत्ताकार उत्तर द्या !

तुम्ही जोवर उत्तर देत नाही तोपर्यंत तुम्हाला आम्ही सोडणार नाही. आणखीही बरेच प्रश्न विचारायचेत. पण आमचे वाचक म्हणतील हायवे टॉवर नावाची कोणती इमारत मुंबईत आहे ? वाचकांना एकच सांगणं आहे हायवे म्हटलं कि हल्ली एक्स्प्रेस हायवे असा शब्द झटकन आठवतो. बघा सुटतंय़ का कोडं ते !



देवयानी खोब्रागडे प्रकरण : काही शक्यता

http://bahishkrutbharat.blogspot.in/2013/12/blog-post_20.html
(या पोस्टशी संबंधित मागील पोस्ट वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.)

देवयानी खोब्रागडे प्रकरणी काही शक्यता पुढे आल्या आहेत.

1. देवयानी खोब्रागडे यांना सापळ्य़ात अडकवण्याचा प्लान खूप आधी शिजला असावा. संगीता रिचर्डचे सासरे अमेरिकन राजदूतावासाच्या अधिका-याकडे काम करतात. देवयानीला अटक करण्यापूर्वी संगीताच्या कुटुंबियांना गुपचूप व्हिसा दे‌ऊन अमेरिकन अधिका-यांनी रातोरात अमेरिकेला आणले. आणि भारताकडून वारंवार केलेल्या पत्रव्यवहाराकडे साफ दुर्लक्ष केले आहे. भारताने संगीता रिचर्डविषयी अमेरिकेला सर्व पातळ्यांवर कळवले होते. या सर्व गोष्टी देवयानीला अडकवण्यासाठी केल्यात याकडे निर्देश करतात.

http://navbharattimes.indiatimes.com/india/national-india/devyani-khobragade-is-a-victim-of-conspiracy/articleshow/27603485.cms

2. नीना मल्होत्रा यांना कसं अडकवलं होतं हे मागच्या पोस्टमधे आलंच आहे. नीना मल्होत्रा यांची भारतात पासपोर्ट व व्हिसा संचालक म्हणून बदली झाली. मल्होत्रा आपला अपमान विसरल्या नव्हत्या. भारत सरकारने आपल्या डिप्लोमॅटला नक्कीच भारतात परत आणले होते. पण परराष्ट्र खात्यातले अनेक अधिकारी नाराज होते.

त्यांच्यापुढे अमेरिकेच्या दूतावासात बदली झालेल्या एका समलैंगिक जोडप्याचं व्हिसा प्रकरण आलं. तेव्हां त्यांनी व्हिसा नाकारला. यावर संतप्त झालेल्या अमेरिकन अधिका-यांनी मल्होत्रा यांच्याकडे विचारणा केली, तेव्हा मल्होत्रा यांनी आमच्याकडच्या कायद्यानुसार समलैंगिक संबंध बेकायदेशीर असल्याने व्हिसा देता येणार नाही असं स्पष्टीकरण दिलं.

त्यावर त्याने आमच्याकडे समलैंगिक संबंधांना मान्यता असल्याने तुम्ही अटकाव करू शकत नाही असा दम दिला. अमेरिकनांचा इगो दुखावल्यावर त्यांनी परराष्ट्र खात्यावर दबाव आणला. तेव्हां नीना मल्होत्रा यांची रेकॉड विभागात बदली झाली. या बदलीमुळे अनेक अधिकारी आणखी नाराज झाले. एका फोनवर योग्य भूमिका घेतलेल्या अधिका-याची झालेली बदली अनेकांना आवडली नाही. पण मल्होत्रांच्या वागणुकीचा बदला घेण्याचं अमेरिकनांनी सूतोवाच केलं होतं. त्याचा संबंध या प्रकरणाशी जोडून पाहीला जात आहे.

Ref : http://blogs.outlookindia.com/default.aspx?ddm=10&pid=3109&eid=31

3.   प्रीत भरारा याची राजकिय महत्वाकांक्षा. मागच्या पोस्टमधे उल्लेख आलेला असल्याने इतकेच.

४. वकिलांच्या रॅकेटला भारतीय अधिका-यांची मेड भारतातल्या वेतनाप्रमाणे असते हे एकदा लक्षात आल्यानंतर नीना मल्होत्रा, प्रभू दयाळ केस प्रमाणेच या ही मेडला त्यांनी भुलवून तुला अमेरिकन ग्रीन कार्ड, भरपूर नुकसान भरपाई आणि कुटुंबियांना अमेरिकेत काम आणि नागरीकत्व मिळवून द्यायचं आश्वासन दिलं. त्यानंतर तिला गायब केलं गेलं. नाहीतर ज्या बाईला नीट इंग्लीश बोलता येत नाही आणि अमेरिकन कायद्याप्रमाने अत्यंत कमी वेतन आहे तिला लगेचच अमेरिकेत कोण माझ्याकडे कामावर ये म्हणून ऑफर दिली ? या प्रकरणी सहा महीने तिचा ठाव ठिकाणा कुठे होता आणि अमेरिकेसारख्या ठिकाणी सहा महीने तिला पैसे, राहणं याची मदत कुणी केली हे बाहेर यायला हवं.

तिच्या बचावासाठी तिला नोकरी मिळाली होती असा बचाव जर पुढे केला गेला तर ज्यांनी कुणी तिला नोकरी दिली त्यांना ही बाई सुद्धा व्हिसा प्रकरणात तितकीच गुन्हेगार आहे याची जाणीव नव्हती का ?

तिला पगार दिलाच असेल तर करारपत्र, बॅंक अकाउंट्सचे तपशील हे सर्व अमेरीकन कायद्याप्रमाणे तपासायला हवं. भारताने आता देवयानी भारतात परत आली नाही तरी चालेल पण अमेरीकेला धडा शिकवू अशी भूमिका घ्यायला हवी.

जर हे तपशील मिळाले नाहीत तर संगीता सहा महीने आपला चरितार्थ कसा चालवत होती ? न्यूयॊर्क सारख्या ठिकाणी जिथे कुठून कुठे जायचं हे समजत नाही, तिने छप्पर कुठे मिळवलं आणि तिचं आस्तव्य कायदेशीर होतं का याची माहीती मिळायला हवी.

नाहीतर हा अमेरीकेचा चावटपणा आहे हे या शक्यतेने अधिक गडद होत आहे.

आधीच्या पोस्टमधे आलेल्या फक्त आणि फक्त फॅक्टस या शक्यतांशी जोडून पाहील्या असता आणखीही काही शक्यता असाव्यात असं वाटू लागतं. पण परराष्ट्र खात्याचे व्यवहार सरळच असतील असं आपल्यासारख्यांनी मानण्याचं कारण नसावं. तसंच जे आपल्या डोळ्यांना दिसतं त्या पलीकडे बरंच काही असावं असं मानण्य़ाला जागा आहे. असं असल्यास अशा जबाबदा-या पार पाडणा-या अधिका-यांच्या पाठीशी का उभे राहू नये असं वाटू लागतं.

अमेरीकेचा कायदा मोडला आहे म्हणून ज्यांना दु:खं झालं आहे त्यांचा समाचार घेण्यासाठी आता सवड मिळतेय. तेव्हां ब्रह्मसत्तेच्या जुलाबाची लेखमालिका पुढे नेत आहोत.

वाचत रहा - बहिष्कृत भारत

More to read on this issue
देवयानी ने भेजा दर्दनाक मेल - देवयानी ने भेजा दर्दनाक मेल - Navbharat Times
Nanny Terror in New York - Rediff.com India News 
Khobragade arrest due to escalation gone awry | Delhi Durbar
The Full Allegations Against Indian Diplomat Devyani Khobragade - India Real Time - WSJ  

Friday, December 20, 2013

देवयानी खोब्रागडे प्रकरण : सत्यशोधनाचा एक प्रयत्न




देवयानी खोब्रागडे या भारताच्या वाणिज्य दूतावासाच्या अधिका-याला अटक होऊन कपडे उतरवल्याच्या बातम्या आल्यापासून वादळ उठलं आहे. निरनिराळे प्रवाह आणि मतमतांतरं दिसून येत असली तरी लोकांमध्ये प्रचंड राग खदखदतो आहे. हा राग अर्थातच भारताचं अधिकृत प्रतिनिधित्व करण्यासाठी गेलेल्या महीलेला देण्यात आलेल्या वागणुकीमुळे आहे.

शाळेच्या परिसरात बेड्या ठोकल्या कि शाळेजवळ, अंगझडती कि कपडे उतरवून झडती असे शब्दखेळ करण्यात अमेरिकनांबरोबर त्यांच्या भारतीय भालदार चोपदारांनीही भूमिका घेतली आहे. या लेखात त्याचं विश्लेषण टाळण्यात येत आहे. त्यासाठी स्वतंत्र लेखमालिका सुरू आहे.

या लेखाचा उद्देश नेमकं काय चालू आहे याचा अंदाज घेणे हा आहे.

अमेरिकेने ज्या गुन्हात अटक केली तो गुन्हा अमेरिकेत गंभीर आहे हे अगदी बरोबर आहे. प्रश्न असा आहे कि व्हिएन्ना कराराच्या कलम ४१/१, ४१/२, ४१/३ आणि ४७ अन्वये कॉन्स्युलेटमधल्या अधिका-यालाही अटक करता येत नाही. अमेरिका व्हिएन्ना कराराबाबत नाराज आहे आणि त्यातल्या काही कलमांऐवजी अमेरिकन कायद्याचं पालन व्हावं यासाठी आग्रही होती. विविध देशांच्या वकिलातीला अमेरिकेने याबाबत विनंतीवजा आग्रह केला आहे.

पूर्वीपासून अमेरिकेशी फटकून वागणारे जे देश आहेत त्यात ब्राझील, चीन, इराण अशा देशांचा क्रमांक लागतो. दबून राहणा-या देशांनी लिखीत स्वरूपात नसेल तरी मूक मान्यता दिल्याने अमेरिकनांनी दुबळ्या देशांच्या वकिलातींना लक्ष करून सुरुवातीला कारवाई केली असंच दिसतं.

प्रीत भरारा या मूळ पंजाबी पण आता अमेरिकन असलेल्या वकीलाने तिथे मोठी कुख्याती मिळवली आहे. तो ओबामांच्या पक्षाचा सदस्य असून लोकप्रियता मिळवण्य़ासाठी अल्पसंख्य असणा-या आशियायी आणि त्यातूनही भारतीय उपखंडातील लोकांविरुद्ध कारवाई करतो असं स्पष्ट होत आहे. मी कट्टर अमेरिकन असल्य़ाने भारतियांबद्दल दयामाया नाही हे दाखवण्यासाठी त्याच्याकडून अनेकदा उत्साहाच्या भरात चुकीच्या गोष्टी घडलेल्या आहेत. इथपर्यंत हे सगळं ठीक होतं.

पण या गोष्टीला आणखी एक पदर आहे. अमेरिकेतल्या वकिलांच्या लॉबीचा. अमेरिकेत वकिलांचा एक धंदा झालेला आहे. खरंतर गोरखधंदा हा शब्द वापरायला हवा. कारण अगदी छोट्यात छोटी चूक जी भारतात सोडून दिली जाते त्यासाठी वकील लोक त्यातल्या व्हिक्टीमला संपर्क साधून भल्या मोठ्या रकमेची नुकसानभरपाई मिळवून देतो असं सांगून केस करतात. रक्कम इतकी मोठी असते कि दुसरी पार्टी हबकते. मग त्या पार्टीला फोन येतो कि आम्ही हे प्रकरण रफादफा करू, त्यासाठी रक्कम ठरवली जाते. मग त्या व्यक्तीला माफी मागून सोडलं जातं. अमेरिका जर कायद्याची इतकी पक्की आहे तर गुन्हा केल्यावर सोडायचं कशाला ? त्यात प्रीत भरारासारखे  अ‍ॅटर्नी सामील असल्याशिवाय गुन्हा दाखल करणे आणि माफी मागितल्यावर सोडणे हे पुन्हा पुन्हा घडणार नाही.

देवयानी च्या आधी नीना मल्होत्रा आणि प्रभू दयाळ यांना अशाच केसेसमधे त्रास दिला गेला होता. प्रभू दयाळ यांच्यावर तर त्यांच्या मेडने लैंगिक शोषण आणि कमी वेतनाचे आरोप ठेवले होते. या केसमधेही प्रीत भराराच आग्रही होते. असं म्हटलं जातं कि दयाळ यांनी सेटलमेण्टची तयारी दर्शवल्याने मेडने लैंगिक शोषणाचे आरोप मागे घेतले आणि आरोप सौम्य केले. यावर फक्त माफी मागून प्रभू दयाळ यांची सुटका झाली. तडजोडीची रक्कम प्रभू दयाळ यांनी दिली असावी असं म्हटलं जातं.

नीना मल्होत्रा या राजनैतिक अधिका-यालाही अटक झाली होती. मोलकरणीचं शोषण केल्याचा आरोप ठेवण्यात आला. मल्होत्रा यांनी तडजोडीस नकार दिल्यावर कोर्टाने त्यांना २५०००० लाख डॉलर भरण्यास सांगितले. पण त्या केस मधे दिल्ली उच्च न्यायालयात प्रकरण होतं.  दिल्ली उच्च निर्वाळ्याने मल्होत्रा या राजनैतिक अधिकारी असल्याने त्यांना अटक अथवा दंड करता येत नाही या  निर्वाळ्याने त्यांच्यावरची कायदेशीर प्रक्रिया थंडावली.

प्रश्न असा उठतो कि नीना मल्होत्रा केस मधे वारंवार सांगूनही राजनैतिक कराराचा मुद्दा का नजरेआड केला गेला. इतकी मोठी चूक करणा-या न्यायपालिकेचे गोडवे कसे काय गायचे ? जर एखादा निर्दोष यांच्या तावडीत सापडला तर त्याला काहीच करता येणार नाही. कारण एकदा अडकला कि त्याला वकिलाची मदत घ्यावी लागणार आणि वकील भरपूर पैसे उकळतात.

देवयानींवरचे आरोप

देवयानी खोब्रागडे यांच्यावर जे आरोप आहेत त्याची जंत्री आणि इतर सर्व तपशील याच ब्लॉगवर पहायला मिळतील.

देवयानी खोब्रागडे यांची व्हिसा आणि पासपोर्ट संचालनालयातून अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासात बदली झाली. त्यांना दोन लहान मुलं आहेत. सरकारी अधिका-यांना वेतनाव्यतिरिक्त त्यांच्या हुद्यानुसार सोयीसवलती असतात. पूर्वी कार आणि ड्रायव्हर देखील दिला जाई. आता त्या कमी केल्यात. तरी परदेशात मेड घेउन जाण्यासाठी सरकार परवानगी देतं.  त्यांना दोन लहान मुलं आहेत. परराष्ट्रखात्यातल्या अधिका-यांच्या जबाबदा-या या दिसतात तशा सरळ नसतात. तसच ज्या कामासाठी पाठवलेलं आहे तीच कामगिरी पार पाडण्यासाठी ते गेले असतील असा समज करून घेण्यात अर्थ नाही. याला कुठलाही देश अपवाद नाही.

संगीता रिचर्ड ही बाई देवयांनी यांच्याकडे काम करीत होती. तिला दरमाह ३०,००० रु इतका पगार मिळत होता. तिलाच सोबत नेण्यासाठी ए३ व्हिसाचा फॉर्म भरण्यात आला. या फॉर्मच्या रकान्यात मालकाचे वेतन असा कॉलम आहे. तिथे मालकाचे म्हणून देवयानीचे वेतन भरण्यास सांगण्यात आले. ते ४५०० डॉलर लिहीले गेले. कुठल्याही फॉर्मवर देवयानीच्या सह्या नाहीत. संगीता आणि तिच्या पतीच्या सह्या आहेत.

दुस-या एका करारपत्राद्वारे देवयानी आणि संगीता रिचर्ड यांच्यात ३०,००० रु वेतन ठरले आहे असा करार झाला. त्याला संगीता आणि तिच्या नव-याची मान्यता होती. या करारपत्रात अमेरिकन कायद्याद्वारे वेतन मागता येणार नाही असा एक क्लॉज होता. या कराराचं न्यायक्षेत्र दिल्ली दाखवलं गेलं. हा करार दिल्ली उच्चन्यायालयाच्या कोर्ट फी स्टॅंपद्वारे प्रमाणित करण्यात आला. कुठलाही वाद झाल्यास दिल्ली उच्च न्यायालयाच्या कक्षेच्या अधीन राहू असं ठरल्याने न्यायालयात त्याचं रजिस्ट्रेशन केलं गेलं. इथपर्यंत संगीता रिचर्डला काहीच प्रॉब्लेम नव्हता असं दिसून येतं.

तिथे गेल्यानंतर तिला न्यूयॉकच्या ज्या भागात खोब्रागडे कुटुंबीय राहत होतं त्याच निवासस्थानात एक खोली देण्यात आली. ही खोली खूपच मोठी आणि सुंदर होती असं संगीताने तिच्या डायरीत लिहीले आहे. तिचं जेवणखाण, फिरणं आणि अन्य सोयी तिला उपलब्ध करून दिल्या जात असल्याने ती खूष होती.



 A page in Sangeeta Richrd's Diary

पुढे ती अचानक ब्लॅकमेल करू लागली.  तिचं वागणं बदललं. अमेरिकेच्या कायद्याप्रमाणे मला इतकं वेतन द्या नाहीतर केस करीन अशी ती भाषा करू लागल्यावर देवयानी यांनी तिला मला राजनैतिक संरक्षण असल्याने अटक होणार नाही, पण तू उच्च न्यायालयात लिहून दिलेलं असल्याने कारवाई तुझ्यावरच होईल असं समजावलं. त्यानंतर तिने धमक्या दिल्या आणि गायब झाली असं खोब्रागडे कुटुंबियांचं म्हणणं आहे. ती गायब झाल्यानंतर तशी तक्रार दिल्ली पोलिसात नोंदवली. दिल्ली मेट्रोपोलिटन कोर्टाने तिच्या नावे नोटीस काढली.

तिच्या नव-याकडे तिच्या ठावठिकाण्याबाबत चौकशी केली गेली. पण त्याने मला काही माहीत नाही असं सांगून कानावर हात ठेवले. दिल्ली पोलिसांनी सर्च वॉरण्ट काढून अमेरिकेत ते बजावयाला हवं होतं. त्याऐवजी परराष्ट्रखात्याने अमेरिकेला संगीता रिचर्डला शोधून देण्यासाठी विनंती केली. ती भारतातल्या कोर्टाला हवी असल्याचं कळवलं गेलं. यावर अमेरिकेचं उत्तरच आलं नाही.

संगीताची बाजू ऐकण्यासाठी संगीता हिचं समोर येणं आवश्यक होतं. पण या केसमधे तिची भूमिका अत्यंत संशयास्पद आहे. जे पूर्वी झालं तेच आताही झालं. वकिलाने तिला कोर्टात हजर केलं आणि तक्रार दिली. लगेचच प्रीत भराराने पुढची कारवाई करण्याचे आदेश दिले. ही कारवाई पण टाळता आली असती जर दिल्ली पोलीसांनी वेळीच हालचाल करून संगीताच्या कुटुंबियांना ताब्यात घेत तिची चौकशी केली असती तर.

त्या ऐवजी ते गाफील राहीले आणि अमेरिकन अधिकारी गुपचूप येऊन संगीताच्या कुटुंबियांना व्हिसा देऊन अमेरिकेत घेऊन गेले.  भारतीय नागरिकाला भारताला न कळवता घेऊन  जाणे हा गुन्हाच आहे. त्याबद्दल तक्रार नोंदवली तर त्याला वेळ लागू शकतो. हा अमेरिकेचा उद्दामपणा आहे. या घटनेला आणखीही कंगोरे आहेत. इथे आपण फक्त काय घडलं याबद्दल बोलत आहोत.

पुढे काय झालं हे माहीत आहेच. ज्या गुन्ह्यासाठी यापूर्वी दोन वेळा कर्मचा-यांना सोडण्याची वेळ आली होती तीच कारवाई पुन्हा झाली. यात निश्चितच काळंबेरं आहे. तिला दिलेली वागणूक अत्यंत वाईट होती असं खात्यातल्या सहका-यांना पाठवलेल्या ईमेल वरून उघड होतंय.

प्रीत भरारा यांचे काही कारनामे

प्रीत भराराने या पूर्वी भारतीय राजनैतिक अधिका-याच्या मुलीला अटक केली होती. ती कारवाई चुकीची असल्याचं नंतर सिद्ध झालं. त्या मुलीला अमानुष वागणूक मिळाली. ज्या गुन्ह्यासाठी तिला अटक झाली तो खरं तर चीनच्या वकिलातीतल्या एका अधिका-याच्या मुलीने केला होता. पण प्रीत भराराने त्यांच्यावर कारवाई केली नाही.

पाच नोव्हेंबरच्या न्यूयॉर्क पोस्टच्या अंकात रशियन अधिका-याच्या गुन्ह्याबद्दल माहीती दिली गेली आहे. अमेरिकेच्या औषध योजनेत भ्रष्टाचार करण्यात त्याचा हात होता आणि ते सिद्ध झालं. हा खर तर देवयानीच्या चुकीपेक्षा मोठा गंभीर गुन्हा होता. पण प्रीत भराराने हा दोन देशांमधला मामला आहे असं सांगत त्याला सोडून दिलं.

देवयानीच्या केसमधे जेव्हां केस स्टेट समोर आली तेव्हां दोन देशांमधला कारभार म्हणून सोडून देता आलं असतं. पण भराराने कारवाईचा आग्रह धरला. असं का ?

तिस-या जगातले देश, अन्य गरीब देश या देशातल्या अधिका-यांनाही मेड असते. ते काय तिला अमेरीकेच्या कायद्याने वेतन देतात ? मग त्यांच्यावर कारवाई होते का ? तर त्याचं उत्तर नाही असं आहे.

अन्य काही प्रभावी व्यक्तींना भराराने सोडून दिल्याची उदाहरण ं आहेत तर प्रसिद्दी मिळवणे आणि सनसनाटी निर्माण करण्यासाठी केलेल्या कारवाईत दोन तीन प्रसंगात साफ रपटी खावी लागली आहे.

त्याच्यावर अब्रूनुकसानीच्या दोन केसेस चालू आहेत. त्यातली एक केस स्ट्रॉस कान्ह तर दुसरी सीमा विश्वास या मुलीने केली आहे. आता देवयानी खोब्रागडे यांची संयुक्त राष्ट्रसंघात बदली झाल्याने अमेरिकेच्या व्याख्येत बसणारं संपूर्ण राजनैतिक संरक्षण त्यांना मिळालं आहे. पण पासपोर्ट परत मिळवून त्यांना भारतात परत आणणे हा टप्पा शिल्लक आहे.

Thursday, December 19, 2013

देवयानी खोब्रागडे : अमेरिकेकडून व्हिएन्ना कराराच्या उल्लंघन प्रकरणी दैनिक ब्रह्मसत्तेला लागले जुलाब - भाग १

शरद पवारांना मित्रच कसे हा प्रश्न मला कॉलेजमधे असताना पडायचा. त्यांच्याबद्दल नेहमी चांगलंच छापून यायचं. मग हळू हळू त्याची उत्तरं मिळत गेली. सकाळनगर, पत्रकारनगर, मुंबईला पत्रकारांसाठी मालाडला सदनिका अशी गरीब बिचा-या पत्रकारांना खैरात करून साहेब नेहमीच मित्र जोडत राहीले. आता याच्या बदल्यात दोन शब्द जर चांगले लिहीले तर कुणाच्या पोटात कशाला दुखायला पाहीजे ? आपण फ्लॅट घेतला आहे तर आता राजकिय नेत्यांनी स्वत:साठी भूखंड घेतले तर समजून घ्यायला नको का असा विचार जर केला गेला तर त्यात चुकीचं काय ?
 
पत्रकार खांद्याला शबनम लावून टू व्हीलर वरून फिरायचे दिवस केव्हांच गेले. त्या वेळी टू व्हीलर खड्ड्यातून आपटली कि पाठीत ज्या वेदना व्हायच्या त्यामुळं दुस-या दिवशी ताबडतोबच प्रशासनाला धारेवर धरलं जायचं. आता या प्रकारात काही "अर्थ" आहे का ? अशानं कधी व्हायची प्रगती ? पण जर इलेक्शनच्या आधी खड्ड्यांच्या बातम्या दिल्या तर विरोधात असलेला पक्ष सत्तेवर यायची स्वप्ने पाहू लागतो. त्यांच्याशी अर्थपूर्ण बातचीत होऊ शकते. मग दारात कार, सुंदरसा फ्लॅट, गोरी बायको हे तिशीच्या आतच मिळतं. आयुष्य सायकलवर झिजवलेले पत्रकार ही कल्पना आजच्या युगात एक दंतकथा आहे. हे झालं मनपा लेव्हलला.

राष्ट्रीय स्तरावर तर खूप गंमती जंमती होतात. एका वाहीनीच्या दोन संपादकांनी एका उद्योगसमूहाकडे कोलगेट प्रकरणाची न्यून न दाखवण्य़ाचे शंभर कोटी मागितले होते. पाच कोटींवर त्यांचं समाधान होत नव्हतं. मग नीरा राडीया आणि बरखा दत्त यांनी घालून दिलेले नवे आदर्श हे अनेकांचं स्वप्न बनलं. आता सायकल टू व्हीलर वगैरे वाहनं आउटडेटेड झाल्याने मेडीयाचे प्रश्न बदलले. जेसिका लाल खून प्रकरण, आरुषी तलवार हत्याकांड प्रकरण यात न्यायव्यवस्थेच्या आधीच निकाल देण्याची घाई सुरू झाली. आता न्यायव्यवस्था सर्वोच्च नसून लोकशाहीचा तथाकथित चौथा खांब सुप्रीम बनला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली निवडणूक आचारसंहीता पायदळी तुडवून सर्वेचे निकाल आणि एक्झिट पोल दाखवण्यापर्यंत त्यांची मजल गेली. निवडणूक आयोगाला कायदे आम्हाला लागू होत नाहीत हे ठणकावून सांगण्यापर्यंत त्यांची मजल गेली.

भारतातले कायदे, न्यायव्यवस्था यांची या चौथ्या स्तंभाला किती काळजी आहे हे अण्णांच्या आंदोलनात दिसून आलंच आहे. संसद, तीन सिंहाचं मानचिन्ह (चौथा न दिसणारा)  आणि राज्यघटना यावर कुत्रं मुतताना दाखवणारं व्यंगचित्र काढणा-या असीम त्रिवेदीचा अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा मुद्दा हा संसदेच्या अवमानापेक्षा  त्यांना महत्वाचा वाटला. भारताच्या कायद्यांची जन्मदात्री असलेल्या राज्यघटनेपेक्षा असीम त्रिवेदी हा श्रेष्ठ का याचं उत्तर जुन्या पुराण्या बाडांमधे, पोथ्यांमधे मिळेलच.


न्यायालयाच्या आधीच योग्य काय अयोग्य काय याचा निवाडा पण केला गेला. हाच न्याय फेसबुकवरून कमेण्ट लिहीणा-या पालघरच्या त्या दोन मुलींना लावला का ? न्यायमूर्ती काटजू यांनी लक्ष घातलं म्हणून तिची चूक नव्हती हे स्पष्ट झालं. प्रत्येक वेळी सत्य आणि हे नवे स्वयंघोषीत न्यायाधीश यांच्यात दरी रुंद होऊ लागली. देशहीत देशाचा मान अपमान याहीपेक्षा त्यांचं हित कशात आहे हे आता लपून राहीलेलं नाही. सनातन अशा धर्मसंसदेपुढे आम्ही संसद कधीच मानली नव्हती. तर तिने बनवलेले कायदे आम्ही कसे मानावेत ? या कायद्यांचा मन:स्ताप होतो म्हणून तर आम्ही आलो ना अमेरिकेत ? पक्षातून फुटून आल्यानंतर नव्या पक्षात जर जुन्या पक्षाचा कुणी दिसला कि त्याच्यावर जुनी भडास निघतेच कि नाही ? मग काही लोकांनी ती काढलीच ! असीम त्रिवेदीला या अर्धवट निवासी लोकांचा पाठिंबा मिळाला. ज्याला हे देशभरसे उन्हे लोग समर्थन दे रहे है म्हणतात. लोकांनी आता लवकरच रस्त्यावर येऊन या लोकांना उघडं पाडण्याची गरजच आहे.

डॉ देवयानी खोब्रागडे प्रकरणी ब्रह्मसत्ताला जे जुलाब झालेत ते पोट बिघडलेल्या ब-याच जणांनी पचवले आहेत, त्यांना आवडले आहेत. जरा त्या रुग्णाचाही समाचार घेऊयात....

 
  संयम ठेवावा.